
कोरोना बाधित क्षेत्रात जाऊन आलेला चालक जिल्हा परिषदेत हजर झाल्याने कर्मचाऱयांची धावपळ
रत्नागिरी जिल्हा परिषदमधील एक वरिष्ठ अधिकारी नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी सांगली येथे गाडी घेऊन गेले होते सांगलीमध्ये सध्या कोराेनाचा मोठा प्रादुर्भाव आहे यामुळे सांगली येथून परत आलेले अधिकारी रत्नागिरीत येताच त्यांना कोराेन्टाॅइन करण्यात आले मात्र त्यावेळी चालकाला कोराेन्टाॅइनकरण्यात आले नव्हते हा चालकअचानक जिल्हा परिषद कार्यालयात आल्यावर कर्मचाऱयांच्या घबराट झाली कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांच्या कानी हा प्रकार घातला यानंतर या चालकाला घरी राहण्याची सूचना देण्यात आली व ज्या इमारती चालक गेला होता ती इमारत निर्जंतुकीकरण करण्यात आली हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता त्यानंतर आता जिल्हा परिषदेचे अतिवरिष्ठ अधिकारी नाशिक येथे आपल्या घरी जाऊन आले आहेत त्यामुळे त्यांना देखील आता कोराेटाइन ठेवण्यात येणार की कसे असा प्रश्न जि प कर्मचाऱयांना पडला आहे
www.konkantoday.com