संशयातुन पतीने पत्नीवर केले तलवारीने वार,पत्नी जखमी
आशा सेविकेवर तिच्या पतीनेच तलवारीने वार केले यामध्ये आशा सेविका ऐश्वर्या संतोष कातकर (वय 30, तनाळी नवलेवाडी, ता. चिपळूण) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना डेरवण येथील वालावकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ही घटना सोमवारी तनाळी येथे घडली. याप्रकरणी आशा सेविकेचा पती संतोष दत्ताराम कातकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या कातकर या गावामध्ये जनजागृती करीत असत. त्यांच्याबाबत संशय व्यक्त करून पतीने हातावर, डोक्यात तलवारीने वार केले.यामध्ये ऐश्वर्या या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तत्काळ डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
www.konkantoday.com