
लाकूड वाहतुकीचा पास देण्यासाठी १५ हजारांची लाच लाकूड व्यावसायिकांकडून स्वीकारताना वनपालाला रंगेहात पकडले
लाकूड वाहतुकीची पास देण्यासाठी १५ हजारांची लाच लाकूड व्यावसायिकांकडून स्वीकारताना वनपाल याला रंगेहात पकडले. कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील अनिल हिरारामन राठोड असे अटक केलेल्या वनपालाचे नाव आहे.कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.१) सकाळी पावणे बाराच्या सुमारास नेरूर वनपाल यांच्या कार्यालयात केली. यामुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे कुडाळ तालुक्यातील लाकूड व्यावसायिक आहेत. नेरूरपार वनपाल यांच्या कार्यालयात लाकूड वाहतुकीचा पास मिळविण्यासाठी त्यांनी दि. १५ फेब्रुवारीरोजी अर्ज केला होता. सदर पास देण्यासाठी व लाकूड तोडीचे असे वनपाल यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याचे राठोड याने मान्य केले होते. या प्रकरणी संबंधित लाकूड व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. २९ फेब्रुवारीरोजी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गच्या पथकाने नेरूर वनपाल कार्यालय येथे सापळा रचला. व तक्रारदाराकडून वनपाल राठोड याला १५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले.www.konkantoday.com