रिलायन्स फाउंडेशनने ऑडिओ कॉन्फरन्स द्वारे covid -१९ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुपालकांना पशुधनाविशषयी घरबसल्या जनजागृती केली
रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्या मार्फत ध्वनी चर्चासत्राच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. Covid-19 च्या प्रादुर्भावामध्ये शेतकरी व पशुपालकांच्या समस्या व असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले . ह्या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व कुडाळ तालुक्यातील 20 पशुपालकांनी घरबसल्या मोबाईलच्या साहाय्याने डायल आऊट कॉन्फरन्सच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले पशुधनाविषयी शंकांचे मार्गदर्शन तज्ञ् मार्दर्शकाकडून करून घेतले. या कार्यक्रमासाठी तज्ञ् मार्गदर्शक म्हणून धुळे कृषि विज्ञान केंद्राचे पशुधन विषय तज्ञ् डॉ.धनराज चौधरी यांनी पशुपालकांना उत्तम मार्गदर्शन केले. या ध्वनी चर्चासत्रांध्ये पशुधनाला corona चा संसर्ग होतो का, जनावराची खाद्य नियोजन, लसीकरण,दुग्धव्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन डॉ. धनराज चौधरी यांनी केले. तसेच covid-19 च्या पार्श्वभूमीवर शाषनामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना, पुरवठा याची माहिती रिलायन्स फाउंडेशनचे कृषी तज्ञ् श्री.सचिन मताळे यांनी दिली. या कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाऊंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक श्री. गणपत गावडे यांनी केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू रिलायन्स फाउंडेशनचे व्यवस्थापाक श्री शुभम लाखकर यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन व मार्गदर्शन रिलायन्स फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला पशुपालकांचा व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.