रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यापारी डी एन कुलकर्णी यांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे त्यांची मोठी ऑनलाइन फसवणूक टळली

रत्नागिरीचे प्रसिद्ध व्यापारी व क्लासिक फुड स्टफचे मालक डीएन कुलकर्णी यांना मिलिटरी कॅटिंगच्या नावाने खोटा फोन करून मालाची ऑर्डर देऊन त्यांच्या बँकांचे डिटेल घेऊन खात्यावरील पैसे काढण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला .कुलकर्णी यांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळे फसवणूक करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.डी एन कुळकर्णी हे गेली अनेक वर्षे रत्नागिरी येथे क्लासिक फूड स्टफ नावाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वितरित करतात.काल रात्री सव्वा नऊ च्या दरम्याने 8761883216 ह्या नंबर वरून मनजीत सिंग नावाने मिलिटरी कॅन्टीन मधून बोलत असल्याचा फोन त्यांना आला. रत्नागिरी येथे आज पासून कोरोना मुळे मिलिटरी कॅम्प आठ दिवसकरिता होत असून हे अतिशय गोपनीय आहे.कॅन्टीन करीता दूध 30लिटर, दही 10 kg, पनीर 10 kg तसेच तूप 5 लिटर लागणार असल्याचे त्यांनी सांगितले, सोबत मिलिटरी कॅन्टीन चे ओळख पत्र व्हाट्सअप्प केले, आज सकाळी कुलकर्णी यांनी यानुसार सर्व वस्तूंची व्यवस्था करून सदर नंबर वर फोन केला.त्यांनी ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करतो सांगितल्यावर त्यानी कॅन्टीन चा GST नंबर मागितला, GST नंबर ऐवजी त्यांनी एक पॅनकार्ड पाठवले, त्या PAN नंबर नुसार बील तयार करून त्यांना व्हाट्सअप्प केले आणि माल COLLECT करण्यास सांगितले. त्यांनी अगोदर पैसे ट्रान्सफर करतो सांगून कुळकर्णी यांचे बँक डिटेल्स घेतले ह्या अगोदर कुळकर्णी यांनी NCC कॅम्प ना मालाचा पुरवठा केला असल्याने त्याना काही शंका आली नाही, पण जेव्हा पैसे ट्रान्सफर चा (जमा चा)मेसेज येण्याऐवजी पैसे काढण्याचा मेसेज आला, त्याबरोबर OTP आला त्यावेळी त्यांची खात्री झाली ,आपली फसवणूक होतेय, शंका नको म्हणून त्यांनी दोन वेळा त्यांना कळवलं की मला मेसेज येत नाही, मग त्यांची घाई झाली, त्यांनी तिसऱ्या वेळी ही पैसे काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मेसेज आला असेल तर त्यातील नंबर पाठवला तरच आमच्या बँकेतून तुमचे पैसे ट्रान्सफर होतील अस त्यांनी कुळकर्णी यांना सांगितले. कुळकर्णी यांनी मला मेसेज येत नाहीत, तुम्ही ऑफिसमध्ये येऊन पैसे देऊन माल घेऊन जाण्यास सांगितले.तुम्ही मेसेज मधील नंबर सांगत नसाल तर ऑर्डर कॅन्सल करा असं सांगून त्यांनी फोन कट केला.करोनाची परिस्थिती, त्यात मिलिटरी कॅम्प, व्हाट्सअप्प डीपी वर मिलिटरी युनिफॉर्म, थलसेना कार्ड, पॅनकार्ड, ह्या सर्व गोष्टी मुळे हे खरं वाटत होतं पण केवळ प्रसंगावधानामुळे एका मोठ्या नुकसाना पासून कुळकर्णी यांचा बचाव झाला,
भविष्यात असे कोणाचे नुकसान होऊ नये ह्यासाठी सावधताही बाळगणे
जरुरीचे आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button