रत्नागिरीतील नर्सिंग ट्रेनिंग स्कूल व त्यालगतचा परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित
काल रत्नागिरी येथे कोरोना बाधित रुग्ण सापडले होते.त्यातील एका जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेत कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता.यामुळे ती परिचारिका ज्या ठिकाणी राहते त्या नर्सिंग ट्रेनिंग स्कूल, खारेघाट चा व त्यालगतचा परिसर कोरोना विषाणू बाधित क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) घोषित करण्यात आला आहे. रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी यांनी संदर्भात आदेश जारी केला आहे.
www.konkantoday.com