
न्यू इयर सेलिब्रेशनला गोव्याकडे पर्यटकांची पाठ*,
सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी भारतासह जगभरातील लोक सज्ज झाले आहेत. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासह काही देशात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागतही झालं. भारतात डिसेंबर अखेरीस आणि सणांच्या हंगामात पर्यटक सर्वाधिक गोव्याला पसंती देतात. देश-विदेशातील पर्यटक ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात येतात.
गोव्यातील समुद्र किनारे, बाजारपेठ, नाइट क्लबमध्ये नव वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटक खास भेट देतात. पण सध्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत त्यात गोव्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं म्हटलंय.