जिल्हाधिकारी यांनी सर्वपक्षीय तसेच प्रमुख नागरिकांची आता तरी बैठक घ्यावी- दीपक पटवर्धन
प्रशासन आणि जनता या मध्ये कमालीचा विसंवाद दिसतो.त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे सांगितल्याचे बातम्या मधून समजते पण जिल्हा प्रशासन ही जबाबदार व्यवस्था आहे.ते अस सांगतील हे अविश्वसनीय आहे. आम्ही सातत्याने आधी व्यवस्था मग बाहेरून लोक आणा अस सांगत होतो २९ एप्रिला मी तस पत्र ही दिलाय मात्र वस्थुस्थिती नजरअंदाज करण आता रत्नागिरीकरांच्या जीवाशी खेळ ठरणार आहे.
प्रशासनाने अजून ही सर्व राजकीय पार्टी प्रमुख तसेच प्रमुख व्यक्ती याना बोलावून विश्वासात घ्यावं समन्वय राहिल्यास अजून ही काही करता येईल आणि अडचणी वेळी रत्नागिरीकर कोणताही भेद
मत मतांतर न ठेवता एकत्र येतात हा अनुभव आहे. हतबल न होता प्रशासनाने समन्वय ठेवत मार्ग काढावा असे आवाहन अॅड.दीपक पटवर्धन भाजपा जिल्हाध्यक्ष (द)यांनी केले आहे.
www.konkantoday.com