एसटीची व्यवस्था पण दुप्पट तिप्पट भाडे ऐकून प्रवासी हैराण
राज्यभरातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजूर व लोकांची अवस्था बिकट झाली आहे.राज्य शासनाने गावी जाण्यास एसटीची व्यवस्था केली, पण दुप्पट तिप्पट भाडे ऐकून प्रवासी हैराण झाले आहेत. गावी जायचंय पण तिकीटासाठी पैसेच नसल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे.
चिपळूण आगारातून शनिवारी भंडारा व बुलढाणा या दोन एसटी बस सोडण्यात येणार होत्या.त्यासाठी येथील महसूल प्रशासनाने गुहागर, खेड, दापोली, रत्नागिरी तहसीलदार यांच्याकडे संपर्क साधून सर्व प्रवाशांना चिपळूणमध्ये बोलावण्यात आले होते
एक गाडी सुटण्यास २२ प्रवासी आवश्यक होते. मात्र भंडारा येथे जाण्यास अवघे ११ प्रवासी होते त्यांना प्रत्येकी पाच ते सात हजार रुपये तिकीट होत होते. त्यामुळे लोटे येथून आणखी ६कामगार गावी जाण्यास तयार झाले व चिपळूणमध्ये आले. मात्र तिकीट दर ऐकून ते माघारी फिरले. त्यांना गावो जायचे होते, पण पुरेसे पैसे नव्हते.अखेर उरलेले ११ प्रवासी देखील हे पैसे देण्यास असमर्थ ठरले अखेर भंडारा एसटी बस रद्द करण्यात आली
www.konkantoday.com