
रत्नागिरी बाहेरून रत्नागिरीत नागरिकांना आणण्याच्या निर्णयाचा फेरविचार आवश्यक- अॅड.दीपक पटवर्धन.
कोरोनाचा प्रभाव वाढत असताना अनेक जण रत्नागिरीत दाखल होत आहेत छुप्या मार्गाने प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करूनही अनेक जण येत आहेत.अन्य जिल्ह्यातील प्रामुख्याने मुंबई पुणे पासिंगच्या गाड्या ही रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.30 हजार पेक्षा अधिक लोकांना रत्नागिरीत यायचं आहे .अश्यांची तपासणी तसाच विलगिकरण आरोग्य सुविधा वैद्यकीय अधिकारी या सर्वच व्यवस्थेवर ताण पडत आहे अश्या स्थितीत धोका वाढू शकतो.प्रशासनाने परजिल्ह्यातून नागरिकांना आणण्याच्या निर्णयाचा फेर विचार करावा .आवश्यक सुविधा यंत्रणा आधी परिपूर्ण करावी गाव गावातील शहरातील स्थानिकांना या नागरिकांच्या येण्याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करावी.गावात शहरात केलेली व्यवस्था जाहीर करावी.येणाऱ्या परजिल्ह्यातील नागरिकांची टेस्ट करून त्यांना संस्थात्मक विलगिकरण अनिवार्य करावे लपून गुंगारा देऊन प्रवेश करणाऱ्यांवर लक्ष देऊन कठोर कारवाई करावी.आणि हे सगळं करण शक्य असेल तरच परजिल्ह्यातील नागरिकांना रत्नागिरीत प्रवेश द्यावा रत्नागिरीत असणारे रुग्ण हे ट्रॅव्हल हिस्ट्री चे आहेत पण हे रुग्ण रोग प्रवाहक बनू शकतात आणि रत्नागिरीतील धोका वाढू शकतो.गेले दोन महिने वर्क लोड मूळे प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा आरोग्य यंत्रणा थकली आहे दबावाखाली आहे याचा ही विचार होणे गरजेचे आहे.या सर्वाचा विचार परजिल्ह्यातील नागरिकांना रत्नागिरी प्रवेश देण्या पूर्वी प्रशासनाने करावा,अस मत भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले.