
रत्नागिरीत आज अजून 4 कोरोना बाधित रुग्ण सापडले
आज संगमेश्वर येथील 4 जणांचे अहवाल प्राप्त झाले. हे 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या सर्वांचे स्वॅब नमुने 9 मे 2020 रोजी घेण्यात आले होते. या चौघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. यातील दोन जण चेंबुर येथून आले असून एक जण कांदिवली येथून तर एक जण पनवेल येथून आलेला आहे. या सर्वांना क्वांरटाईन करुन ठेवण्यात आलेले होते.
www.konkantoday.com