सुविधा मिळत नसल्याने परराज्यातील तरुण रस्त्यावर , पोलिसांकडून दखल
लॉकडाउनमुळे पर राज्यातील अनेक कामगार व तरुण विद्यार्थी रत्नागिरीत अडकून पडले आहेत.अन्न पाणी व अपुऱ्या सुविधाबाबत त्यांच्या तक्रारी आहेत.तसेच या लोकांना आपल्या राज्यात परत जायचे आहे याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.आज यातील सत्तर ऐंशी लोक एकत्र आली ते एकत्र येऊन मोर्चाद्वारे आपली कैफियत जिल्हाधिकारींकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे त्या भागातील नेते संजय पुनस्कर यांना ही गोष्ट दिसल्यावर त्यांनी या मुलांकडे चौकशी केली असता आपल्याला आपल्या गावी जायचे आहे असे त्यांनी सांगितले.सध्या आपल्याला खाण्या पिण्याची अडचण होत असल्याचे देखील ते म्हणाले.हे लोक रस्त्यावर एकत्र आल्याने पुनस्कर यांनी तातडीने जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला व त्यांना परिस्थितीची माहिती दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी घटनास्थळी येऊन हस्तक्षेप केला वा त्यांना परत पाठवले.ही मुले रत्नागिरी परिसरातील ग्रामपंचायत हद्दींमध्ये राहत असून त्यांना सुरुवातीला प्रशासनाने व अनेक सामाजिक संस्थांनी अन्नधान्याची मदत केली होती परंतु लाॅकडाऊनची मुदत वाढल्याने या विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.या विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
www.konkantoday.com