दापोली तालुक्यात खवले मांजरासह कासवाची शिकार संशयित ताब्यात
दापोली तालुक्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे दापोलीत अशाच एका घटनेत खवले मांजर तसेच कासवाची शिकार केल्याप्रकरणी येथील वन विभागाच्या अधिकार्यांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील करंजाळी गावातील बालगुडेवाडी येथील कल्पेश तुकाराम बालगुडे असे वन विभागाने ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे कासवाच्या पाठीचे कवच, खवले मांजराची एक पिशवी भरून ठेवलेले अडीच किलो खवले तसेच जिवंत जंगली ससा पिंजर्यात बंदिस्त केलेला आढळून आला. वन विभागाने या प्रकरणी कल्पेश बालगुडे याला ताब्यात घेतले आहे.
www.konkantoday.com