
दापोलीत क्वारोंटाईन वॉर्डात न झाेपता बाहेर झाेपणार्या कुटुंबामधील एकावर गुन्हा दाखल
दापोलीत क्वारोंटाईन वॉर्डात सोशल डिस्टनसिंग न राखता व सूचना न पाळता कक्षाच्या बाहेर येवून झोपण्याचा देखावा रचला व फोटो काढले याप्रकरणी त्या संशयित कुटुंबामधील एकावर दापोली तालुका प्रशासनाने तक्रार दिल्यानंतर दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात या कुटुंबातील महिलांचा देखील समावेश आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अतिथी गृह क्र.१ शेतकरी भवन इमारतीतीत विलगीकरण केंद्र येथे ६ मे रोजी रात्री १२ वाजता गुजरात वरून हर्णे येथे आलेल्या कुटुंबाला दाखल करण्यात आले होते. त्यांना खोलीत ठेवण्यात आले होते, त्यांना बेड, गादी, सतरंजी इत्यादी देण्यात आले.तरी सदर व्यक्तीने त्यांचा सोबत आलेल्या खोलीमध्ये ही व्यवस्था मान्य नसल्याचे सांगून झोपण्यास नकार दिला. त्यांना निवासाची व्यवस्था उपलब्ध करुन दिली असून देखील मुद्दाम निवास कक्षाच्या बाहेर कॉरीडॉर मध्ये झोपण्याचा खोटा दिखावा करून फोटो काढून घेतले. सकाळी नाष्टा सुद्धा या मंडळांनी नाकारला होता.यांच्यावर आता दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com