
जिल्ह्यात येणाऱ्या काही मार्गांवर प्रशासनाकडून निर्बंध जारी
लॉकडाऊनच्या काळात जिल्हयात येणाऱ्या सर्व प्रवाशी वाहनांमधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य आहे. सध्या अनेक मार्गांनी वाहने जिल्हयात येतात. त्यामुळे तपासणीच्या कामावर असणाऱ्या मनुष्यबळाचा योग्य वापर करण्यासाठी काही मार्गांवर निर्बंध लागू करणारे आदेश जारी करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्हयातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने तसेच पुणे महानगर व रत्नागिरी जिल्हा लगतच्या कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्हयातून येणाऱ्या प्रवाशांच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टिने
अ) संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाट येथील कळकदरा येथून रत्नागिरी जिल्हयात प्रवेश करणाऱ्या प्रवाशी वाहनांना आंबा घाट येथील कळकदरा येथून प्रवेश करण्यास बंदी करण्यात येत आहे.
ब) संगमेश्वर तालुक्यातील आंबा घट येथील कळकदरा येथून अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने व मालवाहू वाहने यांना जाणे-येणेसाठी पर्यायी जवळचा मार्ग तहसीलदार, संगमेश्वर व पोलीस निरीक्षक, देवरुख पोलीस ठाणे, देवरुख यांनी समन्वयाने निश्चित करुन गरजेनुसार वाहतुकीस उपलब्ध करुन द्यावा.
क) पुणे महानगर क्षेत्र व रत्नागिरी जिल्हयालगतच्या कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्हयातून प्रवासी वाहनांना संगमेश्वर तालुक्यातील साखरपा मुर्शी चेक नाका (आंबा घाट) मार्गे या एकाच मार्गाने रत्नागिरी जिल्हयाच्या क्षेत्रिय हद्दीत प्रवेश करणे बंधनकारक राहील.
सदर आदेशाचा अंमल 08 मे 2020 पासून ते पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहील. वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी या दृष्टिने मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 116 वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभाग (वाहतुक) व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावयाची आहेत.
www.konkantoday.com