गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ३,३९० नव्या करोना रुग्णांची भर
गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ३,३९० नव्या करोना रुग्णांची भर पडली असून देशात एकूण करोना रुग्णांची संख्या ५६,३४२ झाली असून १,८८६ मृत्यू झाले आहेत. १६,५३९ रुग्ण बरे झाले आहेत. रुण बरे होण्याचे प्रमाण २९.३३ टक्के इतके झाले आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात १०८९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ६३ इतकी झाली आहे. मागील २४ तासात ३७ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आज १६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
www.konkantoday.com