कोकण रेल्वे मार्गावरील पहिली ‘श्रमशक्ती एक्स्प्रेस’ शुक्रवारी थिवीम स्थानकावरून रवाना
अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मातृराज्यात मध्य प्रदेशात घेऊन जाणारी कोकण रेल्वे मार्गावरील पहिली ‘श्रमशक्ती एक्स्प्रेस’ शुक्रवारी थिवीम स्थानकावरून रवाना झाली. यावेळी गेल्या दीड महिन्यापासून अडकून राहिलेल्या मजुरांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ‘लॉकडाऊन’नंतर कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांना घेऊन जाणारी ही पहिलीच प्रवासी गाडी होती. शासनाच्या निकषांनुसार सोशल डिस्टंन्सच्या नियमांचे पालन करून केवळ नोंदणीकृत मजूर लोकांना घेऊन ही रेल्वे गाडी सोडण्यात आली.
गोव्यातील थिवीम स्थानकावरून रत्नागिरी, रोहा, पनवेलमार्गे धावणार्या श्रमशक्ती एक्स्प्रेसला थिवी स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी टाळ्या वाजवून मातृराज्यात परतणार्या ११९६ प्रवाशांना निरोप देण्यात आला. हे सर्व प्रवासी नोंदणीकृत होते. गोव्यातून निघताना या सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात पोहोचल्यावरही त्यांची तेथील प्रशासनाकडून तपासणी केली जाणार आहे.
www.konkantoday.com