राज्यात काल दिवसभरात १ हजार २१६ नवे कोरोना रुग्ण
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ९७४ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात १ हजार २१६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज २०७ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात ३०३१रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली
www.konkantoday.com