
रत्नागिरी जिल्ह्यातील बसेस बेस्टला देण्यास माजी सभापती शौकत मुकादम यांनी केला विरोध
कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे सेवा मार्चपासून बंद करण्यात आली होती त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला होता ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी राज्य परिवहन खात्याकडून टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू करण्यात येत आहे अद्यापही खेडोपाड्यात बसेस सुरू करण्यात आले नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची मोठी गैरसोय होत आहे अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शंभर एसटी बसेस व सुमारे ४५० चालक व अन्य कर्मचारी मुंबईतील बेस्ट उपक्रमासाठी देण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला आहे यामुळे कोकणातील जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केला आहे त्यामुळे आपला या निर्णयाला विरोध असल्याचे पत्र त्याने परिवहन मंत्री अनिल परब यांना दिले आहे
www.konkantoday.com