रत्नागिरी जिल्ह्यात आणखी चार कोरोना बाधित रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी चार कोरोना बाधित रुग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.काल रत्नागिरी जिल्हात कोणीही कोरोना बाधित रुग्ण सापडला नव्हता.परंतु आज एकदम चार कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.एक रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयातील नर्सिंग स्टुडंट आहे.उर्वरीत सगळ्यांची हिस्ट्री मुंबई येथील आहे.त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५ झाली आहे.त्यामुळे एकूण रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या २१ वर गेली आहे.त्यातील ५ रुग्णांना या अगोदरच डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १ मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com