
रत्नागिरी जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना घेऊन एसटी महामंडळाची पहिली बस रवाना
रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउनमुळे इतर जिल्ह्यातील अनेक नागरिक अडकून पडले होते.त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्याचा शासनाने निर्णय घेतला होता.त्याप्रमाणे आज एसटी महामंडळाचे पहिली बस या प्रवाशांना घेऊन रत्नागिरी येथील रहाटाघर बसस्थानकातून सिंधुदुर्गनगरी (ओरोस) कडे रवाना झाली.या बसमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन करण्यात आले.तसेच प्रवाशांनाही मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा,जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर प्रवीण मुंडे,व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.आपल्या जिल्ह्यात परत जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रवाशांनी प्रशासनाला धन्यवाद दिले आहे.