प्रा .सुनील भोईर राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ ने सन्मानित.

रत्नागिरी येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा .सुनील मारुती भोईर यांना अहिल्यानगर शिर्डी येथे बी द चेंज या फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले आहे.राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या सर्व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिर्डी येथे साई निवारा या सभागृहात ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पद्मश्री डॉ. पोपटरावजी पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.२९ जून २०२५ रोजी संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३६ शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला.प्रा. सुनील भोईर यांनी आतापर्यंत विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे. तसेच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत शिखर साहित्य अकादमी छत्तीसगड रायपूर येथे प्रा. भोईर यांना “भारत भूषण” पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.”भारत विभूषण”, या कार्यक्रमा मध्ये ‘बेस्ट टीचर ऑफ द इयर’ हा पुरस्कार दिल्ली येथे “दिल्ली विधानसभा”, सभागृहामध्ये डॉ. अतुल कुमार शर्मा, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे .

गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे आणि बहुउद्देशीय संस्था पुणे या संस्थांद्वारे राज्यस्तरीय आदर्श “शिक्षक रत्न पुरस्कार” प्राप्त झाला आहे. रायपूर येथे “भारतभूषण”, पुरस्कार मिळाला असून त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरचे चार पुरस्कार आणि राज्यस्तरावर दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.दरम्यान, या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्षपदमहाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था कोपरगावचे चेअरमन ओमप्रकाश दादासाहेब कोयटे . यांनी भूषविले. प्रा.सुनील भोईर यांना प्राप्त झालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांचे संस्था आणि समाजातील विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button