चाकरमान्यांना गावी आणण्याची भूमिका अत्यंत चुकीची व घातकी -माजी आमदार रमेश कदम
आत्ताच्या परिस्थितीत चाकरमान्यांना गावी आणण्याची भूमिका अत्यंत चुकीची व घातकी असल्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितले.कोकणातील लाखो चाकरमानी मुंबई-पुण्यात अडकले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना गावाची ओढ लागली आहे. जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी चाकरमान्यांना गावी पाठविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, या मागणीला माजी आमदार श्री. कदम यांनी कडाडून विरोध केला आहे.सध्या राज्यसरकार मुंबईतील चाकरमान्यांना गावी पाठविण्याच्या तयारीत आहे. मात्र, कोकणात चाकरमानी आल्यास मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण होण्याचा संभव आहे. चाकरमानी आपलेच आहेत. केवळ भावनिक आणि राजकीय हितासाठी असे निर्णय उचित ठरणार नाहीत.
www.konkantoday.com