कोरोना साठी रात्रंदिवस लढणार्या महिला आशा व आरोग्य कर्मचार्यांकरीता शिवश्री हाॅस्पिटलमध्ये क्षणभर विश्रांती ची सोय

दिवसेंदिवस कोरोना चा कहर वाढत आहे मात्र कोरोनाच्या विरोधात जे खरच ग्राऊंड वर ( युध्द भूमीवर ) काम करतात ते आरोग्य कर्मचारी , आशा भगिनी !!
यांच्या बाबतीत बोलायचं तर कधीही कुरकूर न करता ही सर्व मंडळी कसलीच पर्वा न करता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देत असतात . अशावेळी काम करताना शौचालय , पिण्यासाठी थंड पाणी मिळणेसुध्दा शक्य होत नाही , दिवसेंदिवस उन्हाचा कहर वाढत चालला आहे , सर्वेक्षणाचे काम करताना बहुदा चालतच फिरावे लागते ही बाब लक्षात आल्यावर रत्नागिरीतील कुवारबाव , खेडशी येथे काम करणार्या आशा भगिनी व आरोग्य कर्मचार्यांकरीता रत्नागिरी कारवांचीवाडी येथील शिवश्री हाॅस्पिटलमध्ये क्षणभर विश्रांतीची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे , तेथे दुपारच्या वेळेत क्षणभर विश्रांती घेवू शकतात , त्यामध्ये विश्रांतीसाठी २ बेड , पंखा , पिण्याचे थंड पाणी , स्वच्छतागृह , शीतपेय , मोबाईल चार्जिंग , आदी सोई उपलब्ध करण्यात आल्या आहेत , त्यामुळे दुपारच्या वेळेतलं जेवण शांतपणे घेवू शकतील व थोडी विश्रांती घेवून पुढील काम अधिक जोमाने करू शकतील.शिवश्री हाॅस्पिटलच्या या उपक्रमाचे काैतुक हाेत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button