कोरोना तपासणीचे रत्नागिरी जिल्ह्यात अजुन ६३५ अहवाल प्रलंबित
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना तपासणी प्रलंबित अहवालाची संख्या ६३५ (08 मे 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत)च्या घरात गेली आहे.यामध्ये संस्थात्मक व होम क्वारंटाइन मध्ये असलेल्या लोकांचे काही अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जिल्हयात तपासणीसाठी घेण्यात आलेले आत्तापर्यंत नमुने 2400 ,एकूण आलेले पॉझिटिव्ह अहवाल 21,एकूण आलेले निगेटिव्ह अहवाल 1742 , नाकारलेल्या स्वॅबची संख्या 2 इतके आहे.तसेच गेल्या 24 तासात 349 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 345 अहवाल निगेटिव्ह तर 4 पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हयात आज अखेर 1624 जण होम क्वारंटाईन मध्ये आहेत.
www.konkantoday.com