कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडा-मनसेचे आमदार राजू पाटील
गेल्या काही दिवसांपासून आपल्या गावी जाण्यासाठी उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आणि इतर ठिकाणच्या रेल्वे तर्फे गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र मुंबई, ठाणे,नवी मुंबई ,पनवेल, दिवा , कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर या शहरांमध्ये अनेक कोकणवासीय नागरिक,कर्मचारीवर्ग मोठ्या प्रमाणात राहतो
त्यांच्याकरिता सरकारने विशेष ट्रेन सोडाव्यात अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. राजू पाटील यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेच्या डीआरएमना ट्विट केले आहे.
www.konkantoday.com