
सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही-राज ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहिलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चेहऱ्याला मास्क न लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही, असं मोघम उत्तर देत, राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.
‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मास्क लावण्याचा नियम असूनही राज ठाकरे यांनी तो का पाळला नाही, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना विचारला हाेता
www.konkantoday.com