रत्नागिरी शहरात दारूची नव्हे तर दुधाची चोरी
लोक डाऊनमुळे काही महिने दुकाने बंद असल्याने राज्यात अनेक शहरात दारूचे दुकाने फोडल्याची किंवा दारूच्या बाटल्या चोरून नेल्याचे प्रकार घडले आहेत रत्नागिरी शहर मात्र यात कुठेच नव्हते परंतु रत्नागिरी शहरात आज दारूची नव्हे तर दुधाची चोरी झाली आहे शहरात अनेक छोट्या मोठ्या दुकानातून दुधाची विक्री होत असते दूध पुरवठा करणाऱया एजन्सीज सकाळी दुकाने उघडली नसली तरी दुकानाच्या बाहेर दुधाचे क्रेट अथवा पिशव्या ठेवून जातात आज पहाटे राम नाक्याजवळील एका दुकाना बाहेर अशाच बाहेर ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या चोरून नेण्यात आल्या चोरट्याने पिशव्या चोरताना आजूबाजूच्या लोकांची नजर चुकवली मात्र चोरट्यांच्या या चोरीच्या करामती सीसीटीव्हीत कैद झाले आहेत आपल्या मालकीच्या दुधाच्या पिशव्या असल्या प्रमाणे दुधाच्या पिशव्या घेऊन जाणारा चोरटा आतापोलिसांच्या हातात येतो का हे पाहायचे
www.konkantoday.com