
कोकण रेल्वे प्रशासनाने नेपाळ रेल्वेसोबत २३ कोटींचा सामंजस्य करार.
कोकण रेल्वे प्रशासनाने नेपाळ रेल्वेसोबत २३ कोटी रुपयांचा रेल्वे प्रणालीवरील डेमू गाड्या सेवाच्या संचलन अन देखभालीसाठी करार केलेला असतानाच रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाशी सामंजस्य करार केला. या करारांतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील बोगदा प्रकल्पासाठी तांत्रिक सहाय्य कोकण रेल्वे प्रशासनाकडून केले जाणार आहे.
पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे.या सामंजस्य करारावर कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, रस्ता विकासचे सुदीप चौधरी, मोर्थ यांनी दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत स्वाक्षर्या केल्या. भागीदारीचे उद्दिष्ट कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बोगदा सुरक्षा ऑडिटमधील कौशल्याचा लाभ मिळवून दिला जाणार आहे.www.konkantoday.com