पायी मध्यप्रदेश येथे निघालेल्या परप्रांतीय मजुरांना खेड रेल्वे स्थानकानजीक रोखले
लॉकडाउनमुळे दैनंदिन खर्च आणि मजुरी याचा ताळमेळ बसत नसल्याने पायी मध्यप्रदेश येथे निघालेल्या परप्रांतीय मजुरांना खेड रेल्वे स्थानकानजीक रोखून परत पाठविण्यात आले. मध्यप्रदेशातील सीधी या आदिवासी बहुल जिल्ह्यातील हे मजूर असून ते महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदाराकडे प्रतिदिनी २५०रुपये मजुरीवर काम करत होते.
कशेडी ते परशुराम घाट या ४४ किमीच्या टप्प्याचे काम कल्याण टोलवेज या कंपनीने घेतले आहे. या कामासाठी
काही मजूर आले आहेत. या ठेकेदाराकडे एकूण ८० आहेत. संचारबंदीमुळे जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने मजुरी आणि जेवणासाठी होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने मजुरांची उपासमार होऊ लागली हाेती.
www.konkantoday.com