
देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली
छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती. संभाजीराजे यांच्या या ट्विटला रिप्लाय देत देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असे फडणवीसांनी आपल्या रिप्लायमध्ये म्हटले आहे.
www.konkantoday.com