जिल्ह्यात एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली माहिती यंत्रणेला कळवावी ज्येष्ठ नागरिक संघाचे आवाहन
करोनामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढला असून या कालावधीत नागरिकांना शिथिलता देण्यात आली असली तरी ६५ वर्षावरील नागरिकांनी बाहेर पडू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली माहिती रत्नागिरी ज्येष्ठ नागरिक संघ व नजीकच्या पोलिस ठाण्यात कळवण्यात यावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे.
६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा याशिवाय घरामधून बाहेर पडू नये, असे स्पष्ट केले आहे. काही भागात जीवनावश्यक सेवा घरपोच पुरवण्याची सुविधा नाही. त्यामुळे अशा ज्येष्ठ नागरिकांनी आपली माहिती ज्येष्ठ नागरिक संघ, नजीकचे पोलीस ठाण्याकडे कळवावी. त्याचप्रमाणे पोलिस नियंत्रणकक्ष ०२३५२/२२२२२२ याठिकाणी व ज्येष्ठ नागरिक संघ ९४२००४२४०९ याकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com