
अडकून पडलेल्या नागरिकांच्या अगतिकतेमुळे एसटी महामंडळ करतेय त्याची पिळवणूक- अॅड.दीपक पटवर्धन
लॉक डाउन मूळे अडकून पडलेल्या नागरिकांना अनेक परवानग्याचे मांडव ओलांडताना नाकीनऊ आले आहेत त्यात आता एस टी महामंडळ अडकलेल्या नागरिकांच्या असहयतेचा गैरफायदा घेताना दिसत आहे.
एस टी महामंडळाने खर तर मोफत नागरिकांना प्रवासाची सोय करून अडकलेल्या नागरिकांना स्वगृही पाठवण्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते मात्र शासनाने संवेदनशीलते ला हरताळ फासत नागरिक प्रवाश्यांना जाण्यासाठी ४४ रु व रिकामी गाडी परत येईल त्या साठी ४४रु प्रति किलोमीटर असा दर अधिक ५०रु असे चार्जेस भरून प्रवासाची सुविधा देऊन आधीच पिचलेल्या परप्रांतीय नागरिकांच्या परिस्थितीची चेष्टा केली आहे ही शुद्ध पिळवणूक आहे निर्दयता आहे हा निर्णय लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या शासनाचा नसून संधीसाधू दलालांची मानसिकता जोपासलेल्या वृत्तीचा आहे. जाण्याचे आणि परत येणाऱ्या गाडीचे चार्जेस घेण्याच्या निर्णयाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.सरकार चे मनसुबे कोरोना संकटात अडचणीत सापडलेल्या जनतेला लुटण्याचे आहेत असे स्पष्ट दिसते.महामंडळाच्या या निर्णयाचा आपण निषेध करत आहोत.सरकारने एसटी महामंडळाला तात्काळ जिजिया करा सारखा आकारलेला दर रद्द करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी भाजपचे रत्नागिरी(द.) जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
www.konkantoday.com
