
रत्नागिरी जिल्ह्यात मद्य होम डिलिव्हरीचा तो आदेश रद्द, नियमांचे पालन करून मद्यविक्री दुकानं सुरू करण्याला मान्यता
राज्यात मद्याची दुकाने उघडल्यानंतर होणाऱ्या वाढत्या गर्दीमुळे शासनाने काही ठिकाणी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता.रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप मद्याची दुकाने उघडलेले नाहीत.रत्नागिरीत मद्याची होम डिलिव्हरी मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन विचार करून ऑनलाइन ऑर्डर व होम डिलिव्हरीसाठी परवानगी दिली होती.असा आदेश देखील जिल्हाधिकाऱयांनी काढला होता.मात्र सध्या कायद्यांमध्ये होम डिलिव्हरीची तरतूद नसल्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा आदेश रद्द करून नवीन आदेश काढून नियमांचे पालन करून मद्यविक्री दुकानं सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
नवीन आदेशाप्रमाणे रत्नागिरी जिल्हयातील सर्व नगरपरिषद । नगरपंचायत हददीमधील स्वतंत्र (Stand-alone) तसेच ग्रामीण क्षेत्रातील (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) सर्व एफएल.2, सीएलएफलटिओडी-3,एफएलबीआर.2. सीएल.3, सीएलबीआर-2 या किरकोळ मद्यविक्री अनुज्ञाप्तीधारकांना Social Distaning चे सक्तीने पालन करुन सीलबंद मद्याची विक्री करण्यास मान्यता दिली आहे.
कोविड-19 या विषाणुचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी तसेच मद्यविक्री आस्थापनेसमोर होणारी
गर्दी टाळण्यासाठी थेट अनुज्ञप्तीच्या आस्थापनेमधून मद्याची विक्री करतांना मा. आयुक्त, राज्य उत्पादन,शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील संदर्भातील अनुक्रमांक 2 मध्ये नमुद केलेल्या पत्रातील सूचनानुसार कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
याकरीता, अनुज्ञप्तीधारकांनी खालीलप्रमाणे अटी व शर्तीचे पालन करावे.
4. मद्यविक्री अनुज्ञाप्तीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खात्री करावी.
5. मद्याच्या किंमतीमध्ये वाढ होणार नाही
6. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या तरतुदीचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व
अनुज्ञाप्तीधारकानी घ्यावी.
