‘भाजयुमो’च्या चित्रकला, वक्तृत्व, निबंध ऑनलाइन स्पर्धेचा निकाल जाहीर
भारतीय जनता युवा मोर्चाच्या रत्नागिरी तालुका शाखेने लॉकडाऊनच्या काळात आयोजित केलेल्या चित्रकला, वक्तृत्व व निबंध या ऑनलाइन स्पर्धांचे निकाल जाहीर झाला. सर्व स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धेत 220, निबंध 97, वक्तृत्व 88 स्पर्धकांनी भाग घेतला. विद्यार्थी व खुल्या गटात प्रौढ, ज्येष्ठ स्पर्धकांनी आपल्या मनातील भावना कागदावर उमटवल्या. विजेत्यांना संपर्क साधून लवकरच कॅशलेस बक्षीस व डिजिटल प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.
स्पर्धांचा सविस्तर निकाल असा – निबंध स्पर्धा 12 ते 17 वयोगट- प्रथम पूर्वा महेश दामले, द्वितीय अनुष्का आनंद जाधव, तृतीय मृदूला भाग्यवान पावसकर. खुला गट- प्रथम सुप्रिया शशांक टोळ्ये, द्वितीय पल्लवी प्रकाश झेपले, तृतीय वर्षा तेजस जोशी. वक्तृत्व स्पर्धा- लहान गट प्रथम- कस्तुरी दीपक दळवी, द्वितीय- हर्ष सुरेंद्र नागवेकर, तृतीय मानसी महेंद्र गुरव. मोठा गट- प्रथम नीलेश वामन मराठे, द्वितीय सुयोग जयप्रकाश पाखरे, तृतीय वर्षा तेजस जोशी. ‘मी कलारत्न’ चित्रकला स्पर्धा- 5 ते 12 वयोगट- प्रथम- ईशा सचिन कुरतडकर, द्वितीय कस्तुरी दीपक दळवी, तृतीय ऋषीकेश शशिकांत कोतवडेकर, 12 ते 17 वयोगट- प्रथम पार्थ कांबळे, द्वितीय स्नेह रेडकर, तृतीय हर्ष मोरे, खुला गट- प्रथम प्रभा पिलणकर, द्वितीय सिद्धार्थ पिलणकर व तृतीय हर्षद कोतवडेकर.
चित्रकला स्पर्धेसाठी कोरोना पूर्वीचे व नंतरचे दृष्य, कोरोनाशी झुंज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, संत ज्ञानेश्वर महाराज, स्व. अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे विषय दिले होते. वक्तृत्व स्पर्धेसाठी लॉकडाऊन आणि निसर्ग हा विषय दिला होता. या स्पर्धेत रत्नागिरीतील प्रसिद्ध चित्रकार प्रभा पिलणकर यांनी भाग घेऊन छान चित्र साकारले व बक्षीस मिळवले.
निबंध स्पर्धेसाठी लॉकडाऊन आणि सामाजिक भान, लॉकडाऊन आणि भविष्यातील आव्हाने हे विषय दिले होते. निबंध स्पर्धेसाठी परीक्षक अभिजीत भिडे, चित्रकलेसाठी उदय लिंगायत आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी आनंद पाटणकर यांनी काम पाहिले. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडिया प्रमुख प्रवीण देसाई, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन व संकेत बापट यांनी काम पाहिले.