कशेडी तपासणी नाक्यावर एसटी कर्मचाऱ्याचे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महामार्गावरील खेड नजिक कशेडी येथे सुरु करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याचे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नितीन नलावडे (३२) असे या दुर्देवी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मुंबई, पुणे यासारख्या रेड झोन मधून कोकणात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे तपासणी नाका सुरु करण्यात आला आहे.मुंबई पुणे, ठाणे येथून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना चेकनाक्यावर तैनात ठेवलेल्या एसटी बसने क्वारंटाईन सेंटरवर नेऊन १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाते.
नितीन नलावडे हे एसटी चालक हेच कर्तव्य बजावण्यासाठी मंगळवारी रात्री कशेडी येथे कर्तव्यावर होते. बुधवारी सकाळी६ वाजून दहा मिनिटाच्या सुमारास ते मुंबई, पुणे येथून आलेल्या नागरिकांना घेऊन लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरकडे निघाले होते. ते एसटी सुरू करणार इतक्यात अचानक त्याच्या छातीत दुखू लागलेचेक नाक्यावर हजर असलेल्या अन्य सहकाऱ्यांनी त्याला नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णणावाहिकेने तत्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णलयात उपचारांसाठी आणले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच निधन झाले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button