करोनाच्या सर्वाधिक रुग्णांची आणि बळींची नोंद मंगळवारी झाली
देशात करोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एका दिवसात करोनाच्या सर्वाधिक रुग्णांची आणि बळींची नोंद मंगळवारी झाली. देशात गेल्या २४ तासांत ३,८७५ नवे रुग्ण आढळले असून, १९४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या ४६,७११ तर, एकूण मृतांची संख्या १,५८३ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.
महाराष्ट्रात करोनाचे ८४१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या १५ हजार ५२५ इतकी झाली आहे. मुंबईची रुग्णसंख्या ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे तर महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही १५ हजार ५०० च्या पुढे गेली आहे.
www.konkantoday.com