काेराेनासाठी ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत १००० खाटांचे रुग्णालय उभारणार
करोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समध्ये काेराेनाच्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत १००० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेला दिले. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे
www.konkantoday.com