
रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षा वाहतूक नाही ,दुचाकीवर फक्त एकाच माणसाला परवानगी
रत्नागिरी जिल्हा सध्या ऑरेंज झोनमध्ये आहे परंतु शासनाच्या आदेशाप्रमाणे रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नसल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे रत्नागिरीत आज लोक डाऊनमध्ये शिथीलता आल्यावर अनेकजण वाहनासह रस्त्यावर आले शहरात आज काही प्रमाणात रिक्षा तर मोठय़ा प्रमाणावर दुचाकी व फोरव्हिलर बाहेर आल्या होत्या रत्नागिरी जिल्ह्यात दुचाकीवर फक्त एका माणसालाच परवानगी आहे परंतु शहरात आज दुचाकीवरून दोन जण जातांना दिसत होते तसेच फोर व्हिलर मध्ये देखील तीन पेक्षा अधिक माणसे फिरताना आढळत होती यामुळे नियम मोडणाऱ्या रिक्षा दुचाकी व फोरव्हिलवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे
www.konkantoday.com