
रत्नागिरी जिल्ह्यातील मद्यप्रेमींना दुकाने उघडण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार
केंद्र शासनाने ऑरेंज रेंजमधील शहरातील मद्य दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे मात्र याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱयांनी यांना घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत मद्य दुकानात मद्य खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना सुरक्षित अंतर व अन्य अटी घालण्यात आल्या आहेत मद्य खरेदीसाठी गर्दी झाल्यास मद्य दुकाने बंद करण्याचा अधिकारही प्रशासनाला देण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात बाजारपेठेत असलेल्या मद्य दुकानांना परवानगी देण्यात येणार नाही नगर परिषद हद्दीत सिंगल दुकानांना फक्त परवानगी आहे यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे सध्या तरी मद्यप्रेमींना काही काळ कळ सोसावी लागणार आहे
www.konkantoday.com