आदेश न आल्याने मद्याची दुकाने उघडली नाहीत , मद्यप्रेमींची झाली निराशा
सोमवारपासून दारु शॉप उघडायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र दीड महिना वाट पाहिलेल्या मद्यप्रेमी आतुरतेने सोमवारी मद्य दुकाने उघडण्याची चातका प्रमाणे वाट पहात हाेते आज सकाळी आठ वाजल्यापासून मद्यप्रेमीनी दारु दुकानांबाहेर हजेरी लावली. सकाळी दहा वाजता आठवडा बाजार येथील वाईन शॉप बाहेर शेकडो मद्यप्रेमी दुकाने उघडतील म्हणून वाट पाहात होते बरेच तास झाले तरी दुकाने काही उघडली नाहीत दुकाने सुरू झाली आणि त्यात काहीतरी त्रुटी काढून आपला नंबर जाऊ नये म्हणून मद्य प्रेमींनी अगदी सुरक्षित अंतराचा नियमही पाळला होता होता. दुकान बंद मात्र दुकांनाबाहेर तोबा गर्दी असे सोमवारी चित्र होते.दुकाने उघडण्यासाठी कोल्हापूर येथील आयुक्तांची परवानगी आवश्यक होती ती परवानगी मिळाली नाही व संबंधित प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मद्य दुकानदारांना आज आपली दुकाने उघडता आली नाहीत
www.konkantoday.com