
सोनवी आणि शास्त्री पुलाच्या कामाला सुरूवात, दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांत संभ्रम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी आणि शास्त्री पुलाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. मात्र शास्त्री पुलावर दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालकांची कुचंबणा होत असून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने वाहन चालक आणि पादचार्यांकडून संताप व्यक्त होत आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या आरवली ते बावनदी पुलापर्यंत चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. गेले अनेक वर्षे रखडलेले काम हाती घेण्यात आले असले तरी ठेकेदार कंपनीकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत नसल्याने महामार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. www.konkantoday.com