
सहकारी संस्थांनी मासिक सभे साठी व्हीडिओकन्फरन्सिंग किंवा इतर डिजिटल पर्यायांचा वापर करा
लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रवास करता येत नसल्याने सर्व सहकारी संस्थांच्या मासिक सभा घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत तसेच अधिकारी पदाधिकारी यांना सभेस उपस्थित राहता येत नाही. सहकारी संस्थांचे उपविधीतील तरतुदींनुसार संचालक मंडळाची दरमहा बैठक घ्यावी लागते.
सध्याच्या लॉकडाऊनची परिस्थिती विचारात घेता राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी लॉकडाऊनची परिस्थिती असेपर्यंत मासिक सभा व्हीडिओकन्फरन्सिंग किंवा इतर डिजिटल पर्यायांचा वापर करून घेण्यात यावी. मात्र सभेचा अजेंडा सर्व समिती सदस्यांना वेळेवर Whats App. किंवा ईमेलद्वारे किंवा अन्य डिजिटल माध्यमातून मिळेल याची दक्षता सर्व सहकारी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सचिव यांनी घ्यावयाची आहे. तसेच जे पदाधिकारी सभेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत, त्यांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन होईल याची दक्षता घ्यावयाचे आहे. तसेच मास्क घालूनच सभेसाठी उपस्थित राहायचे आहे, असे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.
www.konkantoday.com