
राज्यातील १०० टक्के जनतेला कोरोनाचा मोफत आरोग्य उपचार
महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे राज्य सरकार मोठे निर्णय घेताना दिसत आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केला. राज्यातील नागरिकांना मोफत आणि कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
www.konkantoday.com