पाहा रत्नागिरी जिल्ह्यात ४मे पासुन काय निर्बंध असणार, नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठा राहणार बंद

सुधारित कलम 144 आदेश
यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात काय निर्बंध असणार याची माहिती दिली आहे

1) परवानगी दिलेल्या चार चाकी वाहनामध्ये एक वाहन चालक व दोन व्यक्ती यांना प्रवासाची मुभा राहील.
तसेच दोन चाकी वाहनावर केवळ चालकास प्रवासाची मुभा राहील.
2) नगरपालिका हद्दीतील मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स आणि बाजारपेठा बंद राहतील (अतिआवश्यक सेवा देणाऱ्या
आस्थापना वगळून)
3) नगरपालिका हद्दीमध्ये सर्व प्रकारची दुकाने (अत्यावश्यक व अत्यावश्यक नसलेली, असा भेदभाव न करता) जी गर्दीत थाटलेली नसून केवळ एकटेपणाने (Single) आस्तित्वात आहेत, ती सुरु ठेवणेस मुभा राहील.
4) अत्यावश्यक असलेल्या व अत्यावश्यक नसलेल्या सेवा पुरविणारी, असा भेदभाव न करता ग्रामीण भागातील
सर्व प्रकारची दुकाने (मॉल वगळून) उघडी राहतील.
5) सर्व शासकीय व खाजगी कार्यालय त्यांचे 33% कर्मचारी संख्येच्या मर्यादेत उपस्थितीने सुरु ठेवता येतील.
6) प्रवासी वाहतूकीची वाहने एक वाहन चालक व दोन प्रवासी, अशा पध्दतीने सुरू ठेवता येतील.
7) आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक, जिल्हादंडाधिकारी यांचे परवानगीशिवाय होणार नाही. परवानगी मिळाल्यास
चारचाकी वाहनांद्वारे अनुज्ञेय बाबींसाठी एक वाहन चालक व दोन प्रवासी अशी वाहतूक अनुज्ञेय राहील.
8) लग्न समारंभात जास्तीत-जास्त 50 लोकांच्या उपस्थितीस अधिन राहून परवानगी राहील. मात्र सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील. तसेच अंत्यविधीच्या कार्यक्रमास 20 लोकांपर्यंत उपस्थिती अनुज्ञेय राहील.
9) मद्य विक्री दुकाने पूर्वपरवानगीने सुरु ठेवता येतील. मात्र मद्य विक्री करताना एका वेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती दुकानाजवळ उपस्थित राहणार नाहीत व प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान 6 फुटांचे अंतर राहील, याची
दक्षता घेणे आवश्यक राहील.
10) पानटपरी व तंबाखूची दुकाने 100% बंद राहतील तसेच अन्य दुकानांतून पान, तंबाखू विक्री करता येणार
नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button