रत्नागिरीतील मोबाईल शॉपी मालकावर गोळ्या झाडणारा पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील मोबाईल शॉपीच्या मालकावर पावणेतीन वर्षांपूर्वी खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला होता. त्यातील तीन संशयितांपैकी गुन्हेगार सचिन भिमराव जुमनाळकर (वय 42, रा. बेलबाग, रत्नागिरी) हा न्यायालयीन कोठडीतच आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. यातील दोघेजण तारखेला न्यायालयात हजर होत नसल्याने खटला चालवण्यात अडचणी येत आहेत.
याबाबत नॅशनल मोबाईल शॉपीचे मालक मनोहर सखाराम ढेकणे (60, रा. फडके उद्याननजीक, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. जुमनाळकरच्या दोन साथिदारांपैकी सिध्दराव नामदेव कांबळे (28, रा. बेलबाग, रत्नागिरी) हा फरार असून मनोहर हनुमंत चालवादी (42, रा. रत्नागिरी) याच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट काढला आहे. 21 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री 9.30 वा.या   संशयितांनी मालकाला अडवून 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. ढेकणे यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्यावर गोळी झाडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button