
अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे यावर्षी देखील कोकणातील आंबा पिक धोक्यात
आता बदलते नैसर्गिक वातावरण आणि अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे यावर्षी देखील कोकणातील आंबा पिक धोक्यात येणार आहे. गेले काही दिवस ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा झालेला शिडकाव यामुळे आंबा पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून आंबा बागायतदार धास्तावले आहेत. त्यातच, तुडतुडा आणि थ्रीप्सचा प्रादुर्भावही आंबा मोहोरवर मोठयाप्रमाणात झाला असून ठिकठिकाणचा बहुतांश मोहोर काळवंडून गेला आहे.
www.konkantoday.com