महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल ५८३ नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १० हजार ४९८ वर गेला आहे. राज्यातल्या ४ जिल्ह्यांत प्रत्येकी एक हजाराहून अधिक रुग्ण आहेत.
एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सात हजारांच्या पार गेल्यामुळे चिंता वाढली आहे. तर पुण्यातील रुग्णांची संख्याही बाराशेच्या घरात आहे. राज्यात आतापर्यंत ४५९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक हजाराहून अधिक रुग्ण आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button