
नाणिज येथिल नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पंतप्रधान निधीलाही ५२ लाखांची मदत
काेराेना बराेबर आज भारत लढत आहे या साठी सरकारच्या मदतीला अनेक जण धावत आहेत. नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने पंतप्रधान निधीला ५२ लाख रुपयांचा निधी दिला आहे. रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे संस्थानतर्फे उपकार्यकारी अधिकारी राजन बोडेकर यांनी हा धनादेश दिला. संस्थानने यापूर्वी १ एप्रिलला मुख्यमंत्री निधीला ५० लाखांचा निधी दिला आहे. त्यामुळे संस्थानने एकूण १ कोटी २ लाखांचा निधी राज्य आणि केंद्र सरकारला दिलाआहे.
www.konkantoday.com