जिल्ह्यात अजूनही कोरोना तपासणीचे 197 अहवाल प्रलंबित
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना तपासणी प्रलंबित अहवालाची संख्या अचानक 197 च्या घरात गेली आहे.यामध्ये संस्थात्मक व होम क्वारंटाइन मध्ये असलेल्या लोकांचे काही अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत त्यामुळे ही नमुन्यांची संख्या वाढलेली दिसत आहे असा याबाबत प्रशासनाने खुलासा केला आहे.प्रलंबित असलेल्या अहवालात जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावरील 64, उपजिल्हा रुग्णालय येथील कामथे 35, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी 14, ग्रामीण रुग्णालय लांजा 10, ग्रामीण रुग्णालय दापोली 35, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर 29, ग्रामीण रुग्णालय गुहागर येथील 10 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची एकूण संख्या 1 हजार 118 आहे. संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 544 आहे.
www.konkantoday.com